तालुका तलाठी संघाचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: April 18, 2016 00:28 IST2016-04-17T22:50:23+5:302016-04-18T00:28:50+5:30

मालेगाव : विविध मागण्यांचे निवेदन सादर

Taluka Talathi Sangh's Dhana Movement | तालुका तलाठी संघाचे धरणे आंदोलन

तालुका तलाठी संघाचे धरणे आंदोलन

मालेगाव कॅम्प : मालेगावी तहसील कार्यालयात तालुका तलाठी संघातर्फे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणा देण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मालेगाव तलाठी संघातर्फे त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक कामे (गौणखनिज चोरी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करीत त्यांना अटकाव करणे, सातबारा उतारा संगणकीकरण यातील त्रुटी दूर करणे), तलाठी व मंडल अधिकारी कार्यालये शासनाने बांधून द्यावीत, महसूल विभागात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा वापर करून भरतीची २५ टक्के पदे त्याच खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवावी, अंशदायी निवृत्तिवेतन योजनांसह इतर योजनांचा विचार करावा. या व इतर मागण्यांचा शासनाने विचार केला नाही तर जिल्हा तलाठी संघासमवेत तालुका संघ येत्या २० एप्रिलपासून आंदोलन छेडणार असल्याचे तालुका तलाठी संघाने सांगितले. धरणे आंदोलनात संघाचे अध्यक्ष डी. बी. पाटील, उपाध्यक्ष पी. एस. पवार, सचिव परांडकर, तलाठी आर. वाय. पवार, आर. बी. सावळे, आर. एस. तांबे, एन. के. दळवी यांसह इतर सदस्य उपस्थित होते.

Web Title: Taluka Talathi Sangh's Dhana Movement