चिंचोली येथे पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
By Admin | Updated: April 27, 2017 00:55 IST2017-04-27T00:55:13+5:302017-04-27T00:55:53+5:30
कृषिमाल व्हेजीटेबल प्रोड्युसिंग कंपन्या स्थापन करून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

चिंचोली येथे पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
सिन्नर : चिंचोली व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपालावर्गीय पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यावर प्रक्रिया करून उद्योग उभारणीसाठी, कृषिमाल व्हेजीटेबल प्रोड्युसिंग कंपन्या स्थापन करून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
पालकमंत्री महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली शिवारात शांताराम गायकवाड यांच्या शेतात शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यशासनाने गेल्या दोन वर्षांत शेतकरी व शेतीसाठी केलेल्या वेगवेगळ्या योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी माणिकराव कोकाटे, लक्ष्मण सावजी, दादाजी जाधव, सुनील केकाण, बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, उपसभापती सोमनाथ भिसे, शहराध्यक्ष पंकज जाधव, मोहचे सरपंच सुदाम बोडके, चिंचोलीचे सरपंच एकनाथ झाडे, माजी सरपंच निवृत्ती होलगीर, कैलास बिन्नर, दादासाहेब सानप, पोपट बिन्नर, रमेश उगले, जयराम आमले, प्रवीण लांडगे, उत्तम गायकवाड, मधुकर सांगळे, सखाराम दराडे, संजय तुंगार, संपत नवाळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)