शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

माध्यमांतील राजकीय विषयावरील  टॉक शोज, चर्चा चिथावणी देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:59 AM

माध्यमांतील राजकीय विषयावरील टॉक शोज, वाद-विवाद, चर्चा, मुलाखती इत्यादी कार्यक्रम चिथावणी देणारे असतात, असे सर्वसाधारण मत नाशिक शहरातील तरुणांनी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. माध्यमातील हिंसा आणि संबंधित चित्रणामुळे तरुण वर्ग अनैतिक वर्तनास प्रवृत्त होतात, असाही निष्कर्ष समोर आला आहे.

नाशिक : माध्यमांतील राजकीय विषयावरील टॉक शोज, वाद-विवाद, चर्चा, मुलाखती इत्यादी कार्यक्रम चिथावणी देणारे असतात, असे सर्वसाधारण मत नाशिक शहरातील तरुणांनी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. माध्यमातील हिंसा आणि संबंधित चित्रणामुळे तरुण वर्ग अनैतिक वर्तनास प्रवृत्त होतात, असाही निष्कर्ष समोर आला आहे.  हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात सर्वेक्षण केले. माध्यमे आणि तरुणांचे वर्तन व वृत्ती या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले.नाशिक शहर परिसरातील सुमारे २३१४ नागरिकांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. यामध्ये १६५४ युवकांचा समावेश होता. या युवकांनी माध्यमांशी संबंधित विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. माध्यमांची उपयुक्तता असली, तरी माध्यमांमध्ये काही दोष असल्याचे नमूद केले. वादविवादात्मक आणि चर्चात्मक कार्यक्रम, मुलाखती टॉक शोज चिथावणी देणारे असतात. या विधानावर सुमारे ५८ टक्के तरुणांनी सहमती दर्शवली, तर माध्यमांमध्ये दाखविली जाणारी हिंसा आणि सेक्सच्या चित्रणामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी अनैतिक वर्तनास प्रवृत्त होतात, असे मत सुमारे ७६ टक्के तरुणांनी व्यक्त केले.नाशिक शहरातील ९५ टक्के तरुण वृत्तपत्रे वाचतात. एकच वर्तमानपत्र वाचणाऱ्यांचे प्रमाण ४२ टक्के आहे, तर पाच-सहा किंवा त्यापेक्षा अधिक वर्तमानपत्रे वाचणाºयांचे प्रमाण ३ टक्के आहे. दररोज किती तास दूरचित्रवाणी पाहता यावर २५ टक्के तरु णांनी उत्तर दिले आहे. दोन तासांपेक्षा अधिक वेळ दूरचित्रवाणीवर वेळ घालविण्याचे प्रमाण जवळपास ७४ टक्के आहे. या सर्वेक्षणात नाशिक शहरातील नागरिकांनी विशेषत: तरुणांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी व उपप्राचार्य तथा विभागप्रमुख प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, प्राजक्ता देशमुख, प्रा. डॉ. हेमंत राजगुरू, प्रा. रमेश शेजवळ आणि मेघा वैद्य आदींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण अभ्यासाचा एक भाग म्हणून करण्यात आले.प्रबोधनात्मक बाबीमाध्यमांद्वारे महनीय व्यक्तींचा संवाद युवकांना प्रेरित करतो, असे जवळपास ७४ टक्के तरु णांचे मत आहे. माध्यमांनी युवकांमध्ये सामाजिकीकरण सोपे केले असल्याचे ६८ टक्के तरु णांचे मत आहे. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माध्यमे मदत करतात, असे जवळपास ५० टक्के तरु णांनी नमूद केले.४माध्यमे खरी जीवनमूल्ये शिकवतात असे ५१ टक्के तरु णांचे मत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता आणि कौशल्ये यात माध्यमांनी सुधारणा केली असल्याचे ७४ टक्के तरु णांचे मत आहे. माध्यमांमुळे समर्पकता वाढते, असे एकूण ७० टक्के तरु णांचे मत असल्याचे आढळून आले.वेशभूषेवर माध्यमांचा प्रभाव पडतो, असे ७८ टक्के तरु णांचे मत आहे. मात्र, इंटरनेटमुळे तरुणांची वास्तविक मित्रांची संख्या घटल्याचे सुमारे ६८ टक्के तरुणांनी मान्य केले आहे. समाजमाध्यमांमुळे तरु णांचे मैदानी आणि बैठे खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सुमारे ७७ टक्के तरु णांनी मान्य केले आहे.

टॅग्स :Mediaमाध्यमेPoliticsराजकारण