सत्ताकेंद्र पुन्हा खेडगाव झाल्याची चर्चा
By Admin | Updated: October 6, 2014 00:09 IST2014-10-05T23:53:24+5:302014-10-06T00:09:47+5:30
सत्ताकेंद्र पुन्हा खेडगाव झाल्याची चर्चा

सत्ताकेंद्र पुन्हा खेडगाव झाल्याची चर्चा
दिंडोरी : दिंडोरी पंचायत समितीच्या उपसभापती पदापाठोपाठ जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण सभापतिपद खेडगाव गावाला मिळाल्याने सत्ताकेंद्र पुन्हा खेडगाव झाल्याची खमंग चर्चा सुरू झाली असून, सत्ता कोणत्याही पक्षाची येवो सत्ता पद खेडगावलाच मिळते हे विशेष. यावेळी तर दोन्ही पदे डोखळे परिवारास मिळाली आहेत हे त्याहूनही विशेष. गेल्या पंचवार्षिकपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचे येथे सदस्य होते. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीत शिवसेनेचे सदस्य निवडून आले असून, दोन्ही सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळाली आहे.