तळेगावला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: October 9, 2016 02:29 IST2016-10-09T02:28:56+5:302016-10-09T02:29:30+5:30

मुलास घेतले ताब्यात

Talegaw tortured on a minor girl | तळेगावला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तळेगावला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक/त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी रात्री उशीरा त्र्यंबक पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान संतप्त ग्रामस्थांकडून अंजनेरी फाट्यासह वाडीवऱ्हे व घोटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरांकडून पीडीत मुलीच्या तपासणीसाठी नातेवाईकांनी आग्रह केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
तळेगाव (अंजनेरी) येथे एका अल्पवयीन मुलाने शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निर्जन कार्यालयामध्ये गावातीलच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली.

Web Title: Talegaw tortured on a minor girl