तळेगाव रोहीचा आवाज पुन्हा दिल्लीत घुमला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:31+5:302021-09-02T04:29:31+5:30

चांदवड : तालुक्यातील तळेगाव रोहीचा आवाज पुन्हा एकदा दिल्लीत घुमला असून, नवी दिल्लीत झालेल्या युथ गेम्स ऑल ...

Talegaon Rohi's voice reverberated in Delhi! | तळेगाव रोहीचा आवाज पुन्हा दिल्लीत घुमला!

तळेगाव रोहीचा आवाज पुन्हा दिल्लीत घुमला!

चांदवड : तालुक्यातील तळेगाव रोहीचा आवाज पुन्हा एकदा दिल्लीत घुमला असून, नवी दिल्लीत झालेल्या युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियन शिपमध्ये तळेगाव रोहीच्या तीन युवा खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले आहे. युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या स्पर्धेत अमोल वाकचौरे याला कुस्तीत, ऋषिकेश गाढे याला बॉक्सिंग तर प्रवीण भोकनळ याला आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक तर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळाले आहे. प्रथमच एकाच गावातील एकाच वेळी तीन खेळाडूंना सुवर्ण पदक मिळण्याची पहिलीच वेळ आहे. अर्जुन पुरस्कार विजेता तथा रोइंगपटू दत्तू भोकनळच्या तालमीत तयार झालेल्या या युवा खेळाडूंच्या यशाने चांदवड तालुक्याची मान उंचावली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या युवा खेळाडूंना अर्जुन पुरस्कार विजेता तथा रोइंगपटू दत्तू भोकनळ चे मार्गदर्शन मिळाले आहे. दत्तूने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले, तेव्हापासून या गावातील व परिसरातील युवा खेळाडूंना क्रीडा स्पर्धांचे आकर्षण वाढले आहे. या खेळाडूंची कोणत्या खेळात क्षमता आहे, हे ओळखून त्यांना तळेगाव रोही येथेच उपलब्ध साहित्याचा उपयोग करून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यानंतर, नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी हे खेळाडू पात्र झाले आहेत.

(०१ तळेगाव रोही)

010921\01nsk_10_01092021_13.jpg

०१ तळेगाव रोही

Web Title: Talegaon Rohi's voice reverberated in Delhi!