तलाठी संघाचा शासनाला ‘अल्टीमेटम’त्

By Admin | Updated: April 18, 2016 00:08 IST2016-04-17T23:03:00+5:302016-04-18T00:08:04+5:30

तलाठी संघाचा शासनाला ‘अल्टीमेटम

Talathi federation government 'ultimatum' | तलाठी संघाचा शासनाला ‘अल्टीमेटम’त्

तलाठी संघाचा शासनाला ‘अल्टीमेटम’त्

त्र्यंबकेश्वर : विविध मागण्यांसंदर्भात त्र्यंबक तालुक्यातील तलाठ्यांनी दुपारी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत निवडणूक व टंचाई ही दोन जिव्हाळ्याची कामे तलाठी करत असून, येत्या २६ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संपावर जाण्याचा अल्टीमेटम तलाठी संघाने शासनाला दिला आहे.
तलाठी सजाची व महसूल मंडळाची पुनर्रचना व मंडल अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सातबारा संगणकीकरण, फेराफारमधील अडचणी, तलाठी व मंडल अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणे, तलाठी कार्यालय बांधून देणे, मंडल अधिकारी कार्यालय बांधणे, सरळ सेवेची दोन टक्के पदे खात्यांतर्गत राखून ठेवावी आदि मागण्यांचा सामावेश आहे. तालुका तलाठी संघातर्फे शनिवारपासून मधल्या सुटीत प्रत्येक तहसील कार्यालयात धरणे आंदोलन केले जाणार आहे. २६ एप्रिलपासून तलाठी व मंडल अधिकारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पत्रकावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष एस. एल. पवार, जिल्हाध्यक्ष एन. वाय. उगले, जिल्हा सरचिटणीस बी. व्ही. खेडकर, विभागीय अध्यक्ष संतोष जोशी, तालुका अध्यक्ष संजय पाटील आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, ११ एप्रिलपासून राज्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी काळ्या फिती लावून कामे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Talathi federation government 'ultimatum'