टाकेद विद्यालयास विज्ञान प्रदर्शनात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 16:28 IST2019-12-20T16:27:58+5:302019-12-20T16:28:58+5:30
सर्वतिर्थ टाकेद (वार्ताहर) इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज टाकेद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात यशमिळविले आहे. विद्यालयातील अमोल भालेराव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.

टाकेद न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज मध्ये अमोल भालेराव व पवार एम् एस. सकभोर यांचा सत्कार करताना प्राचार्य टी. जी. साबळे. डी वाय नरोटे. आर. एन.चौहान, रामचंद्र परदेशी, बाळासाहेब घोरपडे,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे. सचिव प्रकाश जाधव. अशोक तुवर. माजी सचिव सूरेश नलगे,जगन्नाथ कल्हापूरे आदि.
ठळक मुद्देयोग शाळा सहाय्यक गटातुन मन्सू संपतपवार यांनी तालुक्यात प्रथम क्र मांक पटकाविला असून त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
सर्वतिर्थ टाकेद (वार्ताहर) इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज टाकेद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात यशमिळविले आहे. विद्यालयातील अमोल भालेराव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. तसेच माध्यमिक गटातून पेट्रो क्वान्टी फायर या उपकरणाचा तिसरा क्र मांक आला. या साठी अमोल भालेराव यांनी रोशन सकभोर यास मार्गदर्शन केले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य तुकाराम साबळे,उपप्राचार्य दशरथ नरोटे, पर्यवेक्षक रमापती चौहान, दिनकर चव्हाण,कानिफनाथ परकाळे,योगेश धोंगडे,सरपंच ताराबाई बांबळे, आदिंनी परिश्रम घेतले.