शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळेत प्रवेश घेतांना ही घ्या खबरदारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 14:57 IST

पाल्य ज्या शाळेत प्रवेश घेणार आहे त्या इंग्रजी माध्यमाची शाळा आयसीई, स्टेट बोर्ड, सीबीएसई, सीआयपीपी, जीसीएसई या बोर्डांशी संलग्न आहे किंवा नाही याची खातरजमा करावी तसेच ज्या पालकांनी शाळेत पाल्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेच्या फीचे स्ट्रक्चर तपासून घ्यावेत

ठळक मुद्देप्रवेश घेताना इंग्रजी शाळांचे शुल्क विचारात घ्या ! रामचंद्र जाधव : प्रत्येक शाळेत पीटीए स्थापना बंधनकारक

नाशिक : नवीन शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा कल पाहता, त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पालकांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी शाळा सरकारमान्य आहे किंवा नाही याची चौकशी करावी त्याचबरोबर शाळेकडून आकारले जाणारे शुल्क कायदेशीर आहे की नाही याचीही खात्री करण्याचे आवाहन केले आहे.या संदर्भात रामचंद्र जाधव तसेच पीटीए असोसिएशनच्या सुषमा गोराणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाल्य ज्या शाळेत प्रवेश घेणार आहे त्या इंग्रजी माध्यमाची शाळा आयसीई, स्टेट बोर्ड, सीबीएसई, सीआयपीपी, जीसीएसई या बोर्डांशी संलग्न आहे किंवा नाही याची खातरजमा करावी तसेच ज्या पालकांनी शाळेत पाल्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेच्या फीचे स्ट्रक्चर तपासून घ्यावेत व शाळेतील फी कॅपिटेशन फी १९८८ अ‍ॅक्टनुसार आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. तसेच रेग्युलेशन अ‍ॅक्ट २०११ प्रमाणे शाळा दोन वर्षातून १५ टक्के फी एकदाच वाढवू शकते असे कायद्यात तरतूद असल्याने त्याची खात्री करावी, कायद्याप्रमाणे सर्व शाळांना विद्यार्थ्यांचे गणवेष, वह्या, पुस्तके, सॉक्स, शूज, स्कूल बॅग्ज, स्पोर्टस युनिफॉर्म, इत्यादी वस्तू विकण्यास परवानगी नाही तसेच ब्रेकफास्ट हेही शाळा सक्तीचे करू शकत नाही ते आरटीई अ‍ॅक्ट २००९ नुसार शाळा बंधनकारक करू शकत नाही याची दखल नाशिक विभागातील पालकांनी घ्यावी. अशा बाबतीत शाळा बेकायदेशीर मनमानी करीत असतील तर अशा शाळांबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अवगत करण्यात यावे, प्रत्येक शाळेला पॅरेट््स असोसिएशन स्थापन करणे आवश्यक आहे. सन २०११च्या रेग्युलेशन अ‍ॅक्टनुसार पीटीएच्या मान्यतेनुसार शाळेची फी मान्य करून घेणे आवश्यक आहे. पीटीएला शाळेतील तीन वर्षांचे ताळेबंद बघणे बंधनकारक राहील. तसेच कायद्याप्रमाणे ५० रूपये भरून त्याची पावती घेऊन पालकांनी आपापल्या शाळेत पालक-शिक्षक संघाचे सदस्य व्हावे, ज्या शाळेत पीटीएची स्थापना केलेली नसेल त्या शाळेची फी बेकायदेशीर ठरविण्यात येईल. नाशिक विभागातील ज्या अनधिकृत शाळा असतील व मुलांची, पालकांची फसवणूक करून प्रवेश दिले असतील तर त्या पालकांनी परस्पर पोलिसांत गुन्हा दाखल करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिक