शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नगररचनामार्फत सर्वेक्षक नियुक्ती संशयाच्या घेºयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:12 IST

महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात येणाºया सर्वेक्षक नियुक्तीसंदर्भातील निविदाप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली असून, अडीच कोटींचे काम पंचवीस कोटींना देण्याचा घाट घातला जात आहे. याचबरोबर गेल्या १८ वर्षांपासून निविदा न काढता एकाच संस्थेला मोजणीचे काम दिले गेल्याने त्याबाबतही आता चौकशीची मागणी होऊ लागली असून, विरोधकांकडून येत्या महासभेत जाब विचारला जाणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात येणाºया सर्वेक्षक नियुक्तीसंदर्भातील निविदाप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली असून, अडीच कोटींचे काम पंचवीस कोटींना देण्याचा घाट घातला जात आहे. याचबरोबर गेल्या १८ वर्षांपासून निविदा न काढता एकाच संस्थेला मोजणीचे काम दिले गेल्याने त्याबाबतही आता चौकशीची मागणी होऊ लागली असून, विरोधकांकडून येत्या महासभेत जाब विचारला जाणार आहे.  महापालिकेने २९ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वेक्षण सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केलेली आहे. सदर निविदेची किंमत प्रतिवर्षी पाच कोटी याप्रमाणे २५ कोटी रुपये दर्शविण्यात आलेली आहे. निविदेतील सर्वच्या सर्व दर हे शासनाच्या जिल्हा दर सूचीपेक्षा दुप्पट आहेत. निविदेत अपेक्षित दर शासनाच्या जिल्हा दर सूचीप्रमाणेच असले पाहिजे. त्यामुळे किमान २५ टक्के कमी दर प्राप्त होतात. प्रत्यक्षात जे काम वार्षिक तीन कोटींचे आहे ते फुगवून पाच कोटी रुपये करण्यात आले आहे. निविदेत स्पर्धा झाली तर सदरचे काम चक्क दोन ते अडीच कोटी रुपयांत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मनपाने सर्वेक्षण कामाचे दर कशाप्रकारे ठरविले व ते जिल्हा दरसूचीपेक्षा जास्त आहेत, हा चौकशीचा व संशोधनाचा विषय आहे. याशिवाय, गेल्या १८ वर्षांपासून या कामाची निविदा न काढता एकाच संस्थेला काम दिले जात आहे. महापालिका आयुक्तांनी यंदा निविदाप्रक्रिया राबविण्यास सांगितल्याने नगररचना विभागाचा नाईलाज झाला असला तरी, नगररचना विभागाने निविदा अटी-शर्तींमध्ये काही मेख मारून ठेवल्या आहेत. निविदेत वार्षिक उलाढाल अडीच कोटींची असावी, अशी अट घातली आहे. परंतु, मनपाने १८ वर्षांपासून निविदाच काढली नाही तर एवढी प्रचंड उलाढाल इतर संस्था कशी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगररचना विभागाने सदर निविदा काढलेली असली तरी त्यातील कामे नगररचना, भुयारी व पावसाळी गटार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, झोपडपट्टी विभाग यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे या सर्व विभागांनी वेगवेगळ्या निविदा काढल्या तर जास्त स्पर्धक मिळून दर कमी होऊ शकतात. निविदाप्रक्रियेत मनपाशी संबंधित कामाचा अनुभव असलेल्या संस्थांनाच भाग घेण्याची अट आहे. परंतु सदर अट ही अन्य संस्थांना बाद ठरविण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे. टेंडर शुक्लही मोठ्या प्रमाणावर ठेवले आहे. निवड झालेल्या संस्थेने चांगले काम केले तर मुदतवाढ देण्याचे निविदेत नमूद करण्यात आले आहे, याचा अर्थ संबंधित संस्थेला एकदा काम मिळाले की पुन्हा निविदा काढण्याचा प्रश्नच उपलब्ध होणार नाही. नगररचना विभागाने काढलेली ही निविदाप्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली असून येत्या महासभेत त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याची तयारी केली आहे.हे मनपाला करता येईल?मनपाच्या आस्थापनेवर कंत्राटी किंवा कायमस्वरूपी सर्वेक्षक भरती करून काम करून घेता येऊ शकेल. भूमि अभिलेख विभागासोबत निधी सहाय्य करार करून मनपाच्या हिश्श्यापुरता निधी जमा करत सर्व्हे करता येईल. शहरातील विविध खासगी संस्थांचे पॅनल तयार करुन त्यांच्याकडून दर मागवून किमान प्राप्त दरात काम करता येईल. निविदाप्रक्रियेत जास्तीत जास्त स्पर्धा निर्माण करावी.