समाजकंटकांवर कारवाई करा

By Admin | Updated: June 11, 2014 00:20 IST2014-06-10T23:27:29+5:302014-06-11T00:20:49+5:30

समाजकंटकांवर कारवाई करा

Take action on the defectors | समाजकंटकांवर कारवाई करा

समाजकंटकांवर कारवाई करा

 

नाशिकरोड : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व फोटो टाकून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे विविध पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना जनसुराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने काही उपद्रवी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकत आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच फेसबुक बंद करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड, नीलेश साळवे, यश डावरे, राहुल पगारे, राहुल आहिरे, ऋषिकेश कदम, मयुर निकम, पप्पू पटेकर, सचिन जाधव, अमोल मोरे, सुनील गांगुर्डे आदिंच्या सह्या आहेत. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही समाजकंटक सोशल अ‍ॅप्लीकेशनचा दुरुपयोग करून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकत आहे. त्यामुळे शांतता भंग पावत आहे. सदर गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक हरीश भडांगे, अविनाश गायकवाड, राहुल तुपे, संजय दोंदे, रोहित गरुड, अक्षय पगारे, सागर पंडित, अमोल चारोस्कर आदिंच्या सह्या आहेत. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया जेलरोड रिपाइंच्या वतीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर महापुरुषांबद्दल चुकीचे व घाणेरडे लिहिणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. गैरकृत्य करत समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना त्वरित शोधण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर आकाश घुसळे, सुभाष निरभवणे, महेश भोसले, संकेत गांगुर्डे, सुहास घुसळे, नाना बागुल आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Take action on the defectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.