बोरसेसह साथीदारांवर मोक्कान्वये कारवाई करा

By Admin | Updated: April 17, 2016 23:31 IST2016-04-17T23:26:12+5:302016-04-17T23:31:59+5:30

अंबड ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन

Take action against bosses with mock ban | बोरसेसह साथीदारांवर मोक्कान्वये कारवाई करा

बोरसेसह साथीदारांवर मोक्कान्वये कारवाई करा

 सिडको : माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी अंबड गावकऱ्यांच्या वतीने वरिष्ठ पो.निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना निवेदन देण्यात आले.
दिलीप दातीर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या विरोधात मोक्का, एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी व त्यांना तडीपार करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे व्यापक जनहिताच्या दृष्टीने दहशत व गुंडगिरीच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी नाशिक बार असोसिएशनच्या वकिलांनी या गुंडांना जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करू नयेत, अशी विनंती करण्यात आली असून गुंडांना साहाय्य करणाऱ्या वकिलांचा निषेध करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर वामनराव दातीर, सुभाष गायधनी, धनाजी लगड, विष्णू दातीर, भाऊसाहेब दातीर, मनोज दातीर आदिंच्या स्वाक्षऱ्या
आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Take action against bosses with mock ban