तहसीलदारांच्या खुर्चीवरखासदार !
By Admin | Updated: June 3, 2014 00:53 IST2014-06-03T00:11:06+5:302014-06-03T00:53:37+5:30
सटाणा : खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी येथील तहसीलदारांच्या दालनात घेतलेल्या बैठकीप्रसंगी थेट तहसीलदारांच्या आसनावरच ठिय्या मांडल्याने अनेकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे.

तहसीलदारांच्या खुर्चीवरखासदार !
सटाणा : खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी येथील तहसीलदारांच्या दालनात घेतलेल्या बैठकीप्रसंगी थेट तहसीलदारांच्या आसनावरच ठिय्या मांडल्याने अनेकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. यापूर्वी कोणत्याही लोकप्रतिनिधीने या खुर्चीवर बसण्याचे धारिष्ट केलेले नसल्यामुले खासदार भामरे यांच्या या कृतीची चर्चा रंगू लागली आहे. तहसीलदार हे शासकीय अधिकारी असून, शासकीय अधिकार्यांच्या खुर्चीवर लोकप्रतिनिधींनी बसू नये असा दंडक असतो. यापूर्वीही सटाणा येथील तहसील कार्यालयात अनेक वेळा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठका झालेल्या आहेत. त्या बैठकांमध्ये लोकप्रतिनिधी तहसीलदारांच्या खुर्चीवर बसल्याचे ऐकीवात नाही. बागलाणचे भूमिपुत्र खासदार प्रतापदादा सोनवणे असो की, पूर्वाश्रमीचे खासदार बापू चौरे, रामदास गावित, डी. एस. अहेर, डॉ. दौलतराव अहेर यांनी अनेक वेळा तहसीलदारांच्या दालनात विविध प्रश्नांवर बैठका घेतल्यात. या बैठकांच्या वेळी वेळप्रसंगी तहसीलदारांच्या खुर्चीशेजारी खुर्ची ठेवून बाजूला बसले असतील. मात्र तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून बैठक चालविली नाही. मात्र, रविवारी नवनिर्वाचित खासदार डॉ. भामरे यांनी थेट तहसीलदारांच्या खुर्चीवर विराजमान होऊन बैठक घेतली. त्यांच्या बाजूला आमदार उमाजी बोरसे व बाजूला तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार उपस्थित होते. या संदर्भात तहसीलदार पोतदार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. (वार्ताहर)