तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:15 IST2021-03-31T04:15:17+5:302021-03-31T04:15:17+5:30

विकी कीर्ती ठाकूर (२६, रा. शनिमंदिर, गांजवे भवन चाळ, पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडीपाराचे नाव आहे. ठाकूर ...

Tadipar gangster arrested with scythe | तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

विकी कीर्ती ठाकूर (२६, रा. शनिमंदिर, गांजवे भवन चाळ, पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडीपाराचे नाव आहे. ठाकूर यांच्या विरोधात खून, लूटमार आणि अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर २०१९साली तडीपार केले आहे. मात्र संशयिताचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पंचवटीसह शहर गुन्हे शाखा त्याच्या मागावर असताना युनिट-१च्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. गोदावरीच्या काठावर वर्दळीच्या ठिकाणी तो येणार असल्याची माहिती सोमवारी (दि. २९) पोलिसांना मिळाली होती. गाडगे महाराज पुलाजवळ आपल्या ताब्यातील अ‍ॅक्टिवा (एमएच १५ जीझेड ०५०२) दुचाकी उभी करून ठाकूर तिच्यावर बसलेला असताना पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. अंग आणि वाहन तपासणीत त्याच्याकडे धारदार कोयता मिळून आला. या अ‍ॅक्टिव्हाच्या फुटरेस वरील रबरी मॅट खाली लोखंडी कोयता होता. याप्रकरणी युनिट-१चे कर्मचारी प्रवीण वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Tadipar gangster arrested with scythe