बालाजी मंदिरातील तबलावादनाने श्रोते मंत्रमुग्ध
By Admin | Updated: October 21, 2015 23:52 IST2015-10-21T23:51:07+5:302015-10-21T23:52:10+5:30
बालाजी मंदिरातील तबलावादनाने श्रोते मंत्रमुग्ध

बालाजी मंदिरातील तबलावादनाने श्रोते मंत्रमुग्ध
नाशिक : बालाजी ब्रह्मोत्सवांतर्गत कापडपेठ येथील बालाजी मंदिरात सामूहिक तबला वादनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी तबलजींनी त्रिताल आणि झपताल यांचे सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना नितीन वारे, नितीन पवार, सुजीत काळे, प्रमोद भडकमकर, शिरीष पांडे, जयेश कुलकर्णी, दिगंबर सोनावणे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात विशारद, अलंकार उत्तीर्ण झालेली आणि विशारद परीक्षा देत असलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)