शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

श्रवणीय गीतांनी सजली पद्मजा फेणाणी यांची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:05 IST

प्रभात समयीच्या शीतल वातावरणात शब्द-सूर-तालांची सुरेख गुंफण करीत आणि रसिकांच्या मनामनातील आठवणीतील भावमधुर गाणी मैफलीत सादर करीत पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी रसिकांची पाडवा पहाट सुरेल केली.

नाशिक : प्रभात समयीच्या शीतल वातावरणात शब्द-सूर-तालांची सुरेख गुंफण करीत आणि रसिकांच्या मनामनातील आठवणीतील भावमधुर गाणी मैफलीत सादर करीत पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी रसिकांची पाडवा पहाट सुरेल केली.  गंगापूररोडवरील स्व. प्रमोद महाजन उद्यानात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या वतीने पहाट पाडवाअंतर्गत पद्मजा फेणारी -जोगळेकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीच्या प्रारंभी ‘उषा सुक्त ओठात ओथंबले’ हे गीत सादर केले आणि पद्मजा यांनी जणू सुरांच्या मैफलीची नांदी सादर केली. ‘सोनं चाफ्यांची पावलं, दारा बांधता तोरण, अंगणी अंगणी ही कविता फेणाणी यांनी सादर करून दिवाळी कशी सोनं चाफ्याच्या अलवार पावलानं आली याची अनुभूती रसिकांना दिली. प्रख्यात गजलकार कै. सुरेश भट यांच्या ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली..’ या दुर्गा रागातील गीताने मंगलमय वातावरणातील पहाटेचे स्वागत केले अन् इंदिरा संत यांच्या ‘या हो या सूर्यनारायणा’ गीताने उगवत्या सूर्याला सुराचे अर्घ्य दिले.रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत अनेकविध गीते सादर करणाऱ्या पद्मजा यांनी ‘कान्हा कैसे खेलू तुजबीन होली’, विंदा यांची प्रसिद्ध गजल ‘सांगू कसे सारे तुला.. कुसुमाग्रजांचे ‘हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला या गीतासह रु णुझुणु रु णुझुणु रे भ्रमरा , ‘लव लव करी पात या सादर केलेल्या गीतांंना उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.प्रमुख अतिथींचे स्वागत आमदार देवयानी फरांदे व पक्षाचे प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी केले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, महिला व बाल कल्याण विभागाच्या राज्य सचिव विनीता सिंगल, आमदार अनील कदम, महापौर रंजना भानसी, पोलीस अधिकारी हरीश बैजल, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, सुरेश पाटील, बाबासाहेब दातार, अ‍ॅड. नितीन ठाकरे, समीर शेटे, योगेश हिरे, हिरामण आहेर, कौशल्य विकासचे संपत चाटे आदी उपस्थित होते. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक स्वाती भामरे यांनी आभार प्रदर्शन केले.अटलजींच्या निवडक रचना केल्या सादरअटलजींच्या कविता स्वरसाज चढविण्याचे काम फेणाणी यांनी केले असून, त्यातील निवडक रचना सादर करीत त्यांनी उपस्थितांना अटलींच्या काव्यप्रतिभेचे स्मरण करून दिले. अटलजींचे रोती रोती रात सो गई... ही कविता राग अभोगीत सादर करीत ‘आज सुनी पिया’ या बंदिशीची जोड त्यांनी दिली. ‘आज जाने की जिद ना करो..’, ‘तन मन हिंदू...’, ‘गीत नया गाता हूॅँ...’अशा अटलजींच्या अनेक कविता त्यांनी सादर केल्या. त्यांना विजय तांबे, मनोज देसाई, नागेश भोसेकर, जयंत पवार, सोनाली बोरकर, त्रिभुवन पटवर्धन यांनी साथसंगत दिली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकDiwaliदिवाळी