सिंडिकेटचा जुगाड यंदा जमण्याची शक्यता कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:32+5:302021-09-19T04:16:32+5:30
प्रभागातून काँग्रेस बंडखोर विमल पाटील, अपक्ष गुरुमित बग्गा, मनसेच्या नंदिनी बोडके तर भाजपचे कमलेश बोडके असे चौघे जण निवडून ...

सिंडिकेटचा जुगाड यंदा जमण्याची शक्यता कमीच
प्रभागातून काँग्रेस बंडखोर विमल पाटील, अपक्ष गुरुमित बग्गा, मनसेच्या नंदिनी बोडके तर भाजपचे कमलेश बोडके असे चौघे जण निवडून आले आहेत. निवडणुकीत माजी खासदार स्व. माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र त्यांचा अपक्ष बग्गा यांच्यासमोर टिकाव लागला नाही, तर भाजपचे अन्य उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेने एकमेकांसमोर उमेदवार न दिल्याने भाजप, सेना व विकास आघाडी यांच्यात लढत झाली होती.
भाजप आणि काँग्रेसचे कधी काळी वर्चस्व असलेल्या प्रभागात गेल्या निवडणुकीत विकास आघाडीने सुरुंग लावला होता. प्रभागात स्थानिक विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक व भाजपचे वर्चस्व असून यंदाच्या निवडणुकीत पुन्हा स्थानिक प्रभागापुरती आघाडी झाली तर भाजपला अडचण निर्माण होणे शक्य आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग मनपा निवडणुकीत झाला तर अनेक इच्छुकांना मुरड घालावी लागणार आहे. दुसरीकडे भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याने आमदार ढिकले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
इन्फो बॉक्स
प्रभागातील समस्या
झोपडपट्टी व गावठाण परिसर असलेल्या प्रभागात कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत, उघड्या गटार, साफसफाई आणि आरोग्याचा प्रश्न, गावठाण भागातील जुन्या रस्त्यांची दुरवस्था, लोंबकळणाऱ्या धोकादायक वीजतारांचा प्रश्न जैसे थे आहे.
निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी फिरकले नसल्याचा आरोप
इन्फो बॉक्स
- कोणत्याही प्रकारची विकासकामे नसल्याचा आरोप
- गावठाण भागाकडे पूर्णतः दुर्लक्ष, प्रभागात अपुरा दूषित पाणीपुरवठा
- धार्मिक परिसर असून साफसफाई नाही, अरुंद रस्ते
कोट...
नाव घेण्यासारखा एखादा माेठा प्रकल्प प्रभागात साकारू शकला नाही. धार्मिक स्थळांचा परिसर असल्याने लाखो भाविक येतात, मात्र अत्यंत अस्वच्छता असते. गावठाण भागाकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे.
मधुबाला भोरे, माजी नगरसेवक
इन्फो बॉक्स
संभाव्य उमेदवार
भाजप - कमलेश बोडके, दिगंबर धुमाळ, उल्हास धनवटे, हरिभाऊ लासुरे, प्रवीण भाटे, महेश महंकाळे, गौरी पवार
शिवसेना - मनोज अदयप्रभू, राजेश भोरे, गुलाब भोये, सचिन टिळे, रूपेश पालकर, नंदू वराडे, हिमांशू गोसावी, संजय थोरवे, मंगला भास्कर, ज्योती देवरे, सीमा गोसावी
काँग्रेस - डॉ. दिनेश बच्छाव, कल्पना पांडे, लक्ष्मण धोत्रे, रोहन कातकाडे, अनिल कोठुळे, सुनील महंकाळे, पूजा कातकाडे
मनसे - नंदिनी बोडके, खंडू बोडके, गणेश कोठुळे, नवनाथ जाधव
राष्ट्रवादी काँग्रेस - रावसाहेब कोशिरे, रामेश्वर साबळे, चिन्मय गाडे, उमेश कोठुळे
तूर्तास अपक्ष - गुरूमित बग्गा, विमल पाटील