इंदिरानगरमध्ये तलवार जप्त
By Admin | Updated: November 6, 2015 23:50 IST2015-11-06T23:49:35+5:302015-11-06T23:50:27+5:30
इंदिरानगरमध्ये तलवार जप्त

इंदिरानगरमध्ये तलवार जप्त
इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी (दि़५) रात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवले़ यामध्ये एक ठिकाणाहून तलवार जप्त करण्यात आली असून, यादीवरील बारापैकी सात गुन्हेगार घरी आढळून आले़ इंदिरानगरमधील वडाळागाव, सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, पिंगूळबाग, साठेनगर, आलिशान सोसायटी, झीनतनगर, भारतनगर, गणेशनगर, शिवाजीवाडीसह परिसरात गुरुवारी रात्री आठ त दहा वाजेच्या सुमारास कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले़ यावेळी आलिशान सोसायटीत राहणारा संशयित शाहरूख अयुब शेख (२२) हा मांगीर बाबा चौकातील मोकळ्या जागेतून तलवार घेऊन फिरत असताना त्यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़ यावेळी पोलिसांनी यादीवरील बारा गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली़ त्यापैकी घरी आढळलेल्या सात जणांची चौकशी करण्यात आली़ पंधरा वाहनांची तपासणी करून त्यापैकी दोन वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई, तर दोन वाहने जप्त करण्यात आली़ यावेळी बारा टवाळखोरांवरही पोलिसांनी कारवाई केली़