स्वाइन फ्लूसदृश आजाराने युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: April 20, 2015 01:47 IST2015-04-20T01:47:46+5:302015-04-20T01:47:49+5:30
स्वाइन फ्लूसदृश आजाराने युवकाचा मृत्यू

स्वाइन फ्लूसदृश आजाराने युवकाचा मृत्यू
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू असलेल्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील युवकाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला़ मयत युवकाचे नाव सुनील विश्वनाथ गांगुर्डे (२६) असे आहे़ गुरुवारी (दि़१६) जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, त्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़ गांगुर्डे यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि़१८) रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये सहा रुग्ण उपचार घेत असून, त्यामध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)