नाशिकमध्येदेखील ‘स्वाइन फ्ल्यू’ने डोके वर काढले

By Admin | Updated: February 7, 2015 00:05 IST2015-02-07T00:04:39+5:302015-02-07T00:05:32+5:30

नाशिकमध्येदेखील ‘स्वाइन फ्ल्यू’ने डोके वर काढले

Swine flu was also removed in Nashik by the head | नाशिकमध्येदेखील ‘स्वाइन फ्ल्यू’ने डोके वर काढले

नाशिकमध्येदेखील ‘स्वाइन फ्ल्यू’ने डोके वर काढले

नाशिक : नागपूर, नांदेड, सोलापूर, सांगली पाठोपाठ नाशिकमध्येदेखील ‘स्वाइन फ्ल्यू’ने डोके वर काढले असून नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूने एका महिलेचा बळी घेतला. भगूर येथील सविता कातकाळे (३२) या महिलेचा स्वाइन फ्ल्यू या आजाराने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कातकाळे यांना आज सकाळच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाइन फ्ल्यू या आजाराचे लक्षणे दिसत असल्याने डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र उपचारादरम्यान दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा रुग्णालय व शहरातील एका खासगी रुग्णालयात आणखी दोन स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण उपचार घेत असल्याने शहरात पुन्हा स्वाइन फ्ल्यूचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Swine flu was also removed in Nashik by the head