स्वाइन फ्लू : आणखी दोन रुग्ण दाखल
By Admin | Updated: March 20, 2015 00:05 IST2015-03-19T23:54:49+5:302015-03-20T00:05:33+5:30
स्वाइन फ्लू : आणखी दोन रुग्ण दाखल

स्वाइन फ्लू : आणखी दोन रुग्ण दाखल
नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने स्वाइनचा प्रभावदेखील कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच आणखी तीन रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात १३ रुग्ण उपचार घेत असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आज आणखी एका संशयित रुग्णास दाखल करून घेण्यात आले आहे.
उन्हाची तीव्रता वाढेल तसा या विषाणूचा प्रभाव कमी होईल, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगत असून, या आजाराची तीव्रता कमी झाल्याचा दावाही करण्यात येत आहे; परंतु जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने धोका अजूनही टळला नसल्याचेच यावरून दिसून येते.