पेठला पुन्हा स्वाइन फ्लूचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:39 IST2017-09-19T00:31:13+5:302017-09-19T00:39:08+5:30

पेठ : गत पंधरा दिवसात सलग दोन रु ग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून तालुक्यात स्वाईन फ्लूवर कोणत्याही प्रकारची उपचार सुविधा नसल्याने शासकीय यंत्रणा हातावर हात धरून बसली आहे.

Swine Flu Patients Against Peth | पेठला पुन्हा स्वाइन फ्लूचा रुग्ण

पेठला पुन्हा स्वाइन फ्लूचा रुग्ण

पेठ : गत पंधरा दिवसात सलग दोन रु ग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून तालुक्यात स्वाईन फ्लूवर कोणत्याही प्रकारची उपचार सुविधा नसल्याने शासकीय यंत्रणा हातावर हात धरून बसली आहे.
शहरातील बोर्डींगपाडा येथील सोमनाथ पवार यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात रु ग्णांची संख्या वाढत असून या आजाराने शिरकाव केल्याने घबराट पसरली आहे.

Web Title: Swine Flu Patients Against Peth