वडनेरभैरवच्या शेतकऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By Admin | Updated: October 9, 2015 23:01 IST2015-10-09T23:00:47+5:302015-10-09T23:01:45+5:30
वडनेरभैरवच्या शेतकऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू

वडनेरभैरवच्या शेतकऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू
वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील लहानू बाबूराव जाधव (३५) या शेतकऱ्याचा गुरुवारी (दि. ८) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास स्वाइन फ्लूने उपचार सुरू असताना मृत्यू झाला.येथील लहानू जाधव यांना नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर गेल्या बारा दिवसांपासून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना अखेर अपयश आल्याने जाधव यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)