स्वाइन फ्लूचा पुन्हा धसका
By Admin | Updated: June 11, 2015 23:56 IST2015-06-11T23:55:24+5:302015-06-11T23:56:04+5:30
स्वाइन फ्लूचा पुन्हा धसका

स्वाइन फ्लूचा पुन्हा धसका
नाशिक : दीड-दोन महिन्यांनंतर स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल एका महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. याशिवाय शहरातील एका खासगी रुग्णालयात सिन्नर येथील एक वृद्ध महिला उपचारासाठी दाखल झाली आहे.
जानेवारी ते एप्रिल महिन्यांपर्यंत स्वाइन फ्लूने शहरात धुमाकूळ घातला होता. महापालिका कार्यक्षेत्रात या कालावधीत ३३ रुग्णांचा उपचारा-दरम्यान मृत्यू झाला होता. गेल्या दीड महिन्यापासून स्वाइन फ्लू गायब झाला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने नागरिकांनी त्याचा धसका घेतला आहे. बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. मात्र, त्यांचा स्वाइन फ्लूनेच बळी गेल्याचा अहवाल महापालिकेकडे सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाकडून आलेला नव्हता. (प्रतिनिधी)