स्वाइन फ्लूग्रस्त गर्भवती चिंताजनक
By Admin | Updated: March 11, 2015 00:27 IST2015-03-11T00:21:11+5:302015-03-11T00:27:02+5:30
स्वाइन फ्लूग्रस्त गर्भवती चिंताजनक

स्वाइन फ्लूग्रस्त गर्भवती चिंताजनक
जुने नाशिक : येथील बागवानपुरा परिसरात राहणाऱ्या शबाना कुरेशी (२५) या स्वाइन फ्लूग्रस्त गर्भवती महिलेची प्रकृती मंगळवारी (दि.१०) संध्याकाळच्या सुमारास चिंताजनक बनल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
स्वाइन फ्लू संशयित म्हणून कथडा येथील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कुरेशी यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांचा तपासणी अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला साडेआठ महिन्यांची गरोदर आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात बारा संशयित रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहे. यामध्ये नऊ महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. नव्याने दाखल झालेले दोन रुग्ण हे सिन्नर तालुक्यातील आहे. एकूणच स्वाइन फ्लूचा आजार फैलावत असून, नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)