जलतरण प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By Admin | Updated: May 27, 2014 01:09 IST2014-05-27T01:07:37+5:302014-05-27T01:09:30+5:30
सातपूर : येथील निवेकच्या वतीने आयोजित जलतरण प्रशिक्षण शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जलतरण प्रशिक्षण शिबिराचा समारोप
सातपूर : येथील निवेकच्या वतीने आयोजित जलतरण प्रशिक्षण शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
निवेक जलतरण येथे तीस दिवसांचे जलतरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तय्युब नुराणी, जयेश शहा, निवेकचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, क्रीडा सचिव संदीप गोयल, माजी अध्यक्ष रमेश वैश्य, स्वीमिंग पूल चेअरमन अशोक हेबाडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी जलतरण शिबिरार्थींच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर शिबिरात सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन हिरेश बुझरूक यांनी केले. प्रशिक्षक म्हणून भूषण पाटील, संतोष विश्वकर्मा, हिरेन बुझरूक यांनी काम पाहिले.