शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

तोफखान्याचा शपथविधी : मैं भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहूंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:25 IST

भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात.

ठळक मुद्देनातेवाईकांच्या भेटीगाठीचा भावनिक सोहळा रंगला.माता पित्यांना सन्मानपुर्वक ‘गौरव पदक’ प्रदाननवसैनिकांवर मला गर्व : मेजर जनरल असीम कोहली

नाशिक : नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्राच्या प्रत्येक नवसैनिकाने पहाटेपासून मैदानावर सातत्याने ४४ आठवडे घाम गाळत मैदानी खेळ ते कुशल शस्त्र हाताळणीपर्र्यंतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कठोर पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर सैन्यात भरती झालेल्या सर्वसामान्य युवकाचा चेहरा, शरीरयष्टी तर बदललीच; मात्र प्रशिक्षणाने त्याला परिपूर्ण सैनिक बनविले. भारतीय तोफखाना नाशिकरोड रेजिमेंटच्या अशा एकूण २७२ कुशल नवसैनिकांची तुकडी देशसेवेत गुरूवारी (दि.१४) लष्करी दिमाखात दाखल झाली. भारतीय संविधानाचे पालन करत देशसेवेसाठी सदैव सज्ज असून वेळेप्रसंगी बलिदान करण्यासही तयार असल्याची शपथ यावेळी या नवसैनिकांनी तोफांच्या साक्षीने घेतली.भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात. नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून सेना पदक विजेते मेजर जनरल असीम कोहली हे उपस्थित होते. याप्रसंगी सलामी मंचावर ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांच्यासमवेत त्यांनी उपस्थित जवानांची मानवंदना लष्करी थाटात स्वीकारत त्यांना उज्ज्वल भवितव्य व देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ते म्हणाले, तिरंगा आणि तोफांच्या समोर घेतलेली शपथ आपल्या पूर्ण कारकिर्दीत सदैव स्मरणात ठेवावी. तोफखाना केंद्राच्या सैन्यदलात भरती झालेल्या प्रशिक्षणार्थी जवानांनी आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने १९ आठवड्यांचे खडतर सैन्य प्रशिक्षणासह शारीरिक क्षमता, शस्त्र हाताळणी अशा एकूण ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली असून, भारतातील सैन्यदलाच्या सुमारे २९८ ‘युनिट’मध्ये हे नवसैनिक भविष्यात आपले योगदान देणार आहेत. या नवसैनिकांवर मला गर्व असून त्यांच्या संचलनाची समीक्षा करण्याची मिळालेल्या संधीचा अभिमान वाटतो. मला विश्वास आहे, भविष्यात या तुकडीचे सर्व ‘तोपची’ आपली जबाबदारी वेळोवेळी ओळखून कौशल्यपूर्ण कामगिरीने केंद्राचे नाव उज्ज्वल करतील असे ते म्हणाले. उपस्थित जवानांनी सशस्त्र लष्करी संचलन सादर क रत वरिष्ठ अधिका-यांना मानवंदना दिली.दरम्यान, २७२ नवसैनिकांचे नातेवाईकांच्या भेटीगाठीचा भावनिक सोहळा येथील हिरवळीवर रंगला. यावेळी माता-पित्यांसह आजी-आजोबांनी नवसैनिकांना जवळ घेत मायेचा हात फिरवून चांगल्या भविष्यासाठी शुभआशिर्वाद दिले. लष्करी अधिका-यांनी माता पित्यांना सन्मानपुर्वक ‘गौरव पदक’ प्रदान केले. यावेळी अनेकांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी जवान अमोल गामणे याने खास शैलीत केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करSoldierसैनिकNashikनाशिक