लायन्स प्राइडचा शपथग्रहण सोहळा
By Admin | Updated: August 9, 2014 00:53 IST2014-08-09T00:21:20+5:302014-08-09T00:53:08+5:30
लायन्स प्राइडचा शपथग्रहण सोहळा

लायन्स प्राइडचा शपथग्रहण सोहळा
मनमाड : लायन्स क्लब आॅफ मनमाड प्राइडचा शपथग्रहण सोहळा येथील पल्लवी मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजय गुजराथी, संतोष शेट्टी, महेश पोफळे, डॉ. कल्पना करवा, नगराध्यक्ष योगेश पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. कपूरचंद बुरड, मंगलेश बाकलीवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गेल्या वर्षभराच्या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर करण्यात आला. मुकेश गांधी, दीपक पारीख यांनी मनोगत व्यक्त केले.
नूतन सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. संतोष शेट्टी यांनी नूतन अध्यक्ष हेमराज दुगड, सचिव प्रवीण आव्हाड, खजिनदार दत्तात्रय सूर्यवंशी व सदस्यांना शपथ दिली. भविष्यात क्लबच्या माध्यमातून चांगल्या सेवा व उपक्रम राबविण्याचा संकल्प नूतन अध्यक्ष हेमंत दुगड यांनी भाषणातून व्यक्त केला. यावेळी गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेशवाटप करण्यात आले.
लायन्स परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक बरडिया, दिनेश मुनोत, दीपक मकवाने, सुमतीलाल बरडिया व लायन्स सदस्यांनी परिश्रम घेतले. हर्षद गद्रे यांनी सूत्रसंचालन, तर सचिव मुकेश गांधी यांनी आभार मानले. (वार्ताहर)