ओझर येथे स्वच्छतेची शपथ
By Admin | Updated: October 7, 2014 00:39 IST2014-10-07T00:38:46+5:302014-10-07T00:39:57+5:30
ओझर येथे स्वच्छतेची शपथ

ओझर येथे स्वच्छतेची शपथ
ओझर : शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत येथील मिगो सर्व्हिसेसचे संचालक सतीश उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उपाध्ये यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा याबाबत उपाध्ये, श्रीकांत अक्कर, विकास खरे आदिंनी मार्गदर्शन केले. या अभियानात टाऊनशिपमधील मिगो शॉपच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. मिगो सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छ भारत अभियानाची शपथ देण्यात आली. या अभियानात संचालक सतीश उपाध्ये, विकास खरे, जयप्रकाश केदारे, संजय सोनवणे, श्रीकांत अक्कर, सुनील पवार, मोरे आदिंसह कर्मचारी सहभागी झाले.