हिरावाडीरोडवर भरदिवसा घरफोडी

By Admin | Updated: October 21, 2015 22:34 IST2015-10-21T22:33:56+5:302015-10-21T22:34:40+5:30

हिरावाडीरोडवर भरदिवसा घरफोडी

Swarajwari burglar on Hirawadi Road | हिरावाडीरोडवर भरदिवसा घरफोडी

हिरावाडीरोडवर भरदिवसा घरफोडी

पंचवटी : घरमालक बाहेर गेल्याची संधी साधून पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी हिरावाडी रोडवरील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून धाडसी घरफोडी केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला तरी, गेल्या काही दिवसांपासून हिरावाडीरोडवर दिवसा वाढलेल्या घरफोडीमुळे नागरिक मात्र धास्तावले आहेत.
पंचवटीतील हिरावाडीरोडवरील मोकळबाबानगर येथील कृष्णदर्शन अपार्टमेंटमध्ये राहणारे हेमंत अर्जुन जोशी व त्यांची पत्नी भारती हे दोघेही नोकरीनिमित्त सकाळी घराबाहेर पडल्यानंतर भारती जोशी यांचे वडील सुहास जगन आमले हेदेखील सकाळी साडेअकरा वाजता नात दुर्वा हिला शाळेत सोडण्यासाठी घराजवळच्या बस थांब्यावर गेले व दुर्वाला सोडल्यानंतर दर्शनासाठी नजीकच्या मंदिरात जाऊन पुन्हा घरी परतले असता, तोपर्यंत त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सात तोळे सोन्याचे दागिने व सात हजार रुपये रोख असा सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला. अवघ्या तासाभराच्या अंतरात ही घटना घडली. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी जोशी यांच्या शेजारच्या फ्लॅटच्या कड्या बाहेरून लावून घेतल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले. या घटनेची खबर पंचवटी पोलिसांना देण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Swarajwari burglar on Hirawadi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.