शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

सिन्नरच्या भाजीबाजारात चिखलामुळे दलदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:32 IST

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून बाजारात पायी चालणे देखील अवघड बनले आहे.

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून बाजारात पायी चालणे देखील अवघड बनले आहे.कोरोनाचे संकटाने डोके वर काढले तेव्हा शहराच्या विविध भागात भाजीबाजार भरत होता. नवापूल, खासदार पूल ते गंगावेस, वावीवेस, गंगावेस, बसस्थानक ते वाजे विद्यालय या भागात भाजी विक्रेते बसायचे. मात्र, खरेदीसाठी ग्राहकांची होणारी गर्दी करोनाला निमंत्रण देणारी ठरु शकते हे लक्षात आल्याने शहरात सर्वत्र बसणारा भाजीबाजार एकाच ठिकाणी भरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सुरुवातीला गोंदेश्‍वर मंदीराच्या परिसरात भाजीबाजार भरवण्याचा विचार नगर परिषदेने केला होता. मात्र, पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणींमूळे हा विचार मागे पडला. त्यानंतर सर्वांना सोयीचे ठरेल व सोशल डिस्टंन्सिंग पाळणे सोयीचे होईल अशी आडव्या फाट्यावरील वंजारी समाजाची प्रशस्त जागा भाजीबाजारासाठी निश्‍चित करण्यात आली. नगरपरिषदेने दुकानांसाठी जागा आखून दिल्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यापासून संपूर्ण भाजीबाजार या जागेत भरत आहे.सध्या पावसाचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमूळे संपूर्ण भाजीबाजारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलामूळे पायी चालणे दखील अवघड झाले आहे. त्यातच भाजीपाला घेऊन येणारी वाहने थेट भाजीविक्रेते बसतात तेथे जात असल्याने चिखलाचे प्रमाण अजून वाढत आहे. अनेक ग्राहक स्वत:ची चारचाकी वाहने व दुचाकी घेऊन भाजी खरेदीसाठी जात असल्याने चिखल अजून वाढतो आहे. या चिखलातून रस्ता काढत भाजी विक्रेत्यापर्यंत पोहचणे ग्राहकांना अडचणीचे ठरत आहे. अनेकदा ही वाहने चिखल तुडवत जाताना ग्राहकांसह विक्रेत्यांवरही चिखल पाण्याचा मारा करत असतात. त्यामूळे अनेकदा ग्राहकांचे कपडे खराब होत आहेत. बाजारात दररोज शेकडो ग्राहक खरेदीसाठी येत असतात. त्यात महिलांची संख्या अधिक असते. त्याशिवाय तालुक्याच्या विविध भागातील शेतकरी, महिला भाजीपाला विकण्यासाठी दररोज बाजारात येत असतात. बाजारात असणारी चिखलाची ही परिस्थिती ग्राहक व विक्रेत्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची भिती व्यक्त होत आहे. चिखलामूळे डांसाचे प्रमाण वाढल्याचे तक्रार भाजी विक्रेत्यांकडून होत आहे. पाऊस आल्यास मैदानात पावसापासून बचाव व्हावा यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यात चिखलामूळे समस्यांमध्ये वाढ होत आहे. पावसामूळे थंडी वाढली असून बदललेल्या वातावरणाने सर्दीसारखे छोटे-मोठे आजार डोके वर काढू शकतात. त्यातून करोनाला आमंत्रण मिळू शकते.नगर परिषदेने पुढाकार घेऊन भाजी बाजारातील चिखल कमी करण्यासाठी मुरुम टाकावा अशी मागणी भाजी विक्रेते, शेतकरी व ग्राहकांकडून करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग