स्वामी विवेकानंद प्रशिक्षणमाला उत्साहात
By Admin | Updated: September 27, 2014 00:28 IST2014-09-27T00:27:48+5:302014-09-27T00:28:06+5:30
स्वामी विवेकानंद प्रशिक्षणमाला उत्साहात

स्वामी विवेकानंद प्रशिक्षणमाला उत्साहात
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने सिडकोतील उत्तमनगर येथे स्वामी विवेकानंद प्रशिक्षणमाला उत्साहात पार पडली. यानिमित्ताने सहभागी झालेल्या युवकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मनमाड येथील सामाजिक शास्त्रज्ञ दिलीप हांडोरे, पर्यावरणतज्ज्ञ आरती हांडोरे, मध्य प्रदेश येथील रामेश्वर, संस्कृतभारतीचे नाशिकचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह अंकुश बार्शिले यांनी युवकांना मार्गदर्शन केले. युवक चळवळीला सामाजिक आयाम देताना दिलीप हांडोरे यांनी देशाच्या विकासासाठी वेगळी वाट चोखाळावी लागेल, असे मत व्यक्त केले. पाच युवकांचे मार्गदर्शक पालकत्वही त्यांनी स्वीकारले. आरती हांडोरे यांनी वाईन सिटीचे वास्तव मांडताना जिल्ह्यातील वायनरींची अवस्था विशद केली. संस्कृत ग्रंथांचे अध्ययन करून युवकांनी संशोधनाअंती पेटंट मिळवण्याचे आवाहन केले. सामाजिक विकास साधण्याचे आवाहन अभय बाग यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अनिल चांदवडकर यांनी प्रशिक्षणाचा हेतू विशद केला. कार्यक्रमास अशोक कुलकर्णी, सुशीला अन्दोरे, दत्ताजी राळेगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)