स्वामी नारायण नगरला युवतीची आत्महत्या
By Admin | Updated: April 22, 2017 20:27 IST2017-04-22T20:27:30+5:302017-04-22T20:27:30+5:30
स्वामीनारायण नगर भागात राहणाऱ्या २३ वर्षीय युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या

स्वामी नारायण नगरला युवतीची आत्महत्या
नाशिक : स्वामीनारायण नगर भागात राहणाऱ्या २३ वर्षीय युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. युवतीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
श्वेता मारूती जाधव असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी श्वेताने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील छताच्या हुकास ओढणीने गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.