शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

करून झाली सारी उठाठेव सुटता सुटेना कोंडी द्वारकेची

By admin | Updated: May 23, 2014 01:01 IST

पोलिसांची धडपड : पालिकेची कामे, अतिक्रमण अडथळे

पोलिसांची धडपड : पालिकेची कामे, अतिक्रमण अडथळेडोकेदुखी द्वारका सर्कलची (मालिका)नाशिक : द्वारका सर्कलवर होणारी वाहतुकीची कोंडी सुटावी म्हणून शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करून झाले; मात्र तेवढेच प्रयत्न करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरली. त्यामुळे द्वारका सर्कलची डोकेदुखी कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. यावर पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन चौकालगतची अतिक्रमणे, रिक्षा थांबे हटविल्यास रहदारीला रस्ता मिळेल आणि चौकाचाही श्वास सुटण्यास मदत होईल. पुण्या-मंुबईकडून नाशिकला येणार्‍या प्रवाशांसाठी द्वारका सर्कल हे नाशिकचे प्रवेशद्वार आहे. अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी टळावी म्हणून मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपूल आला; पण म्हणून वाहतुकीची कोंडी सुटली नाही. पुण्याकडून येणारी व जाणारी सर्वाधिक वाहतूक या मार्गावर सकाळ-सायंकाळच्या सुमारास असते. त्यामुळे चार मुख्य रस्त्यांबरोबरच समांतर रस्ते आणि उपनगरीय मार्ग यामुळे त्यात अधिकचीच भर पडते. सदरची कोंडी सुटावी या हेतूने वाहतूक पोलीस शाखेने आत्तापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले; परंतु ते सर्व अपयशी ठरले. सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरली, कारण चौकापेक्षा अधिक रस्ते येत असल्याने वेळेचे नियोजन करणे अशा ठिकाणी शक्य होत नाही. उड्डाणपुलापूर्वी याठिकाणी सर्कल होता जो मोठा होता. उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्कल त्याच आकारात ठेवले आहे, तर पादचार्‍यांसाठी भुयारी मार्ग तयार केला, ज्याचा पादचारी उपयोग करताना दिसत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर आहेच; पण त्याचबरोबर वेगही मंदावला आहे. अतिक्रमणांची भरसर्कलला जोडणार्‍या सर्वच रस्त्यांलगत अवैध प्रवासी वाहतूक आणि विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे आणि रिक्षा थांब्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा अडथळा येणार्‍या-जाणार्‍या वाहतुकीला होत असतो. * काय करता येऊ शकेल...- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या भुयारी मार्गाचा वापर पादचार्‍यांनी केला पाहिजे.- महापालिका जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदकाम केले आहे, जे अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो आहे, तो जलद गतीने होणे अपेक्षित आहे.- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या सर्कलचा आकार अजून कमी करणे गरजेचे आहे, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होणे सोपे होईल. - चौकातील सर्वच रस्त्यांलगत असलेले रिक्षा थांबे आणि फुल-फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणांकडे पालिकेने केलेले दुर्लक्षही वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरते आहे. कोट :वाहतूक पोलीस शाखेने महापालिका प्रशासनाला द्वारका सर्कललगतची अतिक्रमणे व रिक्षा थांबे हटविण्याबाबत वारंवार सांगितले आहे; परंतु कोणतीही कारवाई होत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही दोन रस्ते वाहतुकीला खुले झाल्यास अधिक सुलभता येऊ शकेल, असे कळविले आहे. चारपेक्षा अधिक रस्ते येत असल्याने सिग्नल यंत्रणा सुरू करणे अशक्य आहे. पोलीस प्रशासनाबरोबरच महापालिका आणि प्राधिकरणानेही यात लक्ष देणे गरजेचे आहे, तेव्हाच ही समस्या सुटू शकेल. - एम. एम. बागवान, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा