शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मलनिस्सारण भूसंपादन प्रक्रियेस स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:16 IST

पिंपळगाव खांब येथे मनपाने मलनिसारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या गट क्र. ६३ मधील जागा भूसंपादन करण्यास उच्च न्यायालयाने १० जानेवारी २०१८ पर्यंत स्थगिती दिली आहे.

नाशिकरोड : पिंपळगाव खांब येथे मनपाने मलनिसारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या गट क्र. ६३ मधील जागा भूसंपादन करण्यास उच्च न्यायालयाने १० जानेवारी २०१८ पर्यंत स्थगिती दिली आहे.  पिंपळगाव खांब येथे मलनिसारण केंद्रासाठी गट क्र. २ मध्ये सव्वातीन एकर (१.३ हेक्टर) व गट क्र. ६३ मध्ये पावणे दहा एकर (३.९ हेक्टर) अशा एकूण साडेबारा एकरवर मलनिस्सारण केंद्राचे मनपाने आरक्षण टाकले होते. गेल्या २२ नोव्हेंबर रोजी उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग - २च्या वासंती माळी, तहसीलदार राजश्री अहिरराव, मंडळ अधिकारी बी. आर. कसबे, तलाठी एस. के. शिंदे, मनपा मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, मनपा अधीक्षक अभियंता संजय घुगे आदी अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तात पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्राची आरक्षित जागा भूसंपादनासाठी गेले होते. यावेळी गट क्र.२ मधील सव्वातीन एकर जागा भूसंपादित करण्यात आली. मात्र गट क्र. ६३ मधील बाधित शेतकºयांनी जागा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. २२ नोव्हेंबरलाच उच्च न्यायालयाने भूसंपादनाच्या प्रक्रियेला ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्याने तेथील भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली.उच्च न्यायालयात भूसंपादन विभागामार्फत मंगळवार (५ डिसेंबर) प्रतिज्ञापत्र, पंचनामा व काही फोटो दाखल करण्यात आले होते. यावर बुधवारी सुनावणी होऊन बाधित शेतकºयांच्या वतीने अ‍ॅड. अनिल आहुजा यांनी गेल्या २२ नोव्हेंबरला न्यायालयाने ‘जैसे थे’चा हुकूम सकाळी ११.४५ वाजता बजाविला होता. त्यानंतर तेथील भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र न्यायालयात दाखल केलेल्या पंचनाम्यामध्ये गट क्र. २ व गट क्र.६३ मधील जागा २२ नोव्हेंबरला सकाळी ११.२० वाजता भूसंपादित केल्याचे दाखविण्यात आले आहे. वास्तविक गट क्र. ६३ मधील जागा ही संबंधित शेतकºयांच्याच ताब्यात असून, बनावट पंचनामा सादर केल्याचे अ‍ॅड. आहुजा यांनी सांगितले. न्यायालयाने गट क्र. ६३ मधील जागेचा ताबा १० जानेवारी २०१८ पर्यंत घेऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहे. अवमान याचिका दाखल करणार भूसंपादन विभागाचे अधिकारी, मनपा अधिकारी पिंपळगाव खांब सर्व्हे नं. ६३ मधील मनपाने मलनिस्सारण केंद्रासाठी आरक्षित केलेली जागा गेल्या २२ नोव्हेंबरला भूसंपादनास गेले होते. यावेळी उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर सर्व्हे नं. ६३ मधील भूसंपादन प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र ५ डिसेंबरला उच्च भूसंपादन अधिकारी यांच्याकडून प्रतिज्ञापत्र, पंचनामा व काही फोटो सादर केले. मात्र बाधित शेतकºयांनी सांगितले की, जागा भूसंपादित केल्याच्या पंचनाम्यामध्ये वेळ खोटी टाकली आहे. संबंधित अधिकाºयांनी खोटा पंचनामा सादर करून उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. यामुळे अवमान याचिका दाखल करणार असल्याचे बाधित शेतकरी सुरेश बोराडे, प्रभाकर बोराडे, सोमनाथ बोराडे, भिवा बोराडे, दीपक बोराडे, सुकदेव बोराडे आदींनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी