आमदाराच्या बोगस पत्राद्वारे स्थगितीचा डाव
By Admin | Updated: January 7, 2017 01:23 IST2017-01-07T01:23:01+5:302017-01-07T01:23:13+5:30
भंगार बाजार : राजकीय दबावतंत्राचा वापर

आमदाराच्या बोगस पत्राद्वारे स्थगितीचा डाव
नाशिक : अंबड-लिंकरोडवर अनधिकृतपणे वसलेला भंगार बाजार वाचविण्यासाठी व्यावसायिकांनी अनेक उचापती केल्याचे समोर आले आहे. त्यात व्यावसायिकांनी साक्री मतदारसंघातील कॉँग्रेस आमदाराच्या पत्राद्वारे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत आचारसंहितेची ढाल पुढे करत स्थगितीचा डाव रचला. परंतु, खुद्द कॉँग्रेस आमदारानेच सदर पत्रावर आपली स्वाक्षरी नसल्याचे आणि नाशिकच्या भंगार बाजाराशी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा केल्याने सदर प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या बोगस पत्रामागे शहरातील एका लोकप्रतिनिधीचा सहभाग असल्याची चर्चा आहे.
भंगार बाजार हटविण्याची कारवाई थांबवावी यासाठी भंगार बाजारातील व्यावसायिकांनी पुरेपूर प्रयत्न केले.