१२ आमदारांचे निलंबन; कळवणला भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:18 IST2021-07-07T04:18:06+5:302021-07-07T04:18:06+5:30

१२ आमदारांचे नियमबाह्य निलंबन त्वरित मागे घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. दरम्यान, ...

Suspension of 12 MLAs; BJP's agitation reported | १२ आमदारांचे निलंबन; कळवणला भाजपचे आंदोलन

१२ आमदारांचे निलंबन; कळवणला भाजपचे आंदोलन

१२ आमदारांचे नियमबाह्य निलंबन त्वरित मागे घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, संघटन सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, शहराध्यक्ष निंबा पगार, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, माणिक देवरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन सोनवणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष हितेंद्र पगार, गोविंद कोठावदे, विश्वास पाटील, एस. के. पगार, संदीप अमृतकार, नामदेव निकम, किशोर देशपांडे, चंद्रशेखर जोशी, कृष्णकुमार कामळस्कर, मोतीराम वाघ, काशिनाथ गुंजाळ, प्रभाकर निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - ०६ कळवण बीजेपी

कळवणला तहसीलदार कापसे यांना निवेदन देताना दीपक खैरनार, डॉ. अनिल महाजन, निंबा पगार, विकास देशमुख, माणिक देवरे व सचिन सोनवणे आदी.

060721\06nsk_21_06072021_13.jpg

कळवणला तहसीलदार कापसे यांना निवेदन देताना दिपक खैरनार, डॉ. अनिल महाजन,  निंबा पगार, विकास देशमुख,  माणिक देवरे व सचिन सोनवणे आदी.

Web Title: Suspension of 12 MLAs; BJP's agitation reported