रेशन दुकानदारांचा संप स्थगित

By Admin | Updated: January 13, 2017 01:38 IST2017-01-13T01:38:24+5:302017-01-13T01:38:38+5:30

रेशन दुकानदारांचा संप स्थगित

Suspended the dealer's shop | रेशन दुकानदारांचा संप स्थगित

रेशन दुकानदारांचा संप स्थगित

 नाशिक : निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी तूर्त आपला बेमुदत बंदचा निर्णय मागे घेतला असून, गुरुवारपासून धान्य उचलण्यास सुरुवात झाली आहे.
१ जानेवारीपासून रेशन दुकानदारांच्या महासंघाने संपूर्ण राज्यातच बेमुदत संपाची हाक देऊन जानेवारी महिन्याचे धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला होता. शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ त्याचबरोबर रेशन दुकानदारांना दरमहा ३५ हजार रुपये महिना मानधन द्यावे, केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळावे, घासलेटचा कोटा पूर्ववत करावा आदि मागण्याही करण्यात आल्या होत्या. शासन दरबारी यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच राज्यात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात येऊन आचारसंहिता जारी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र देऊन संप स्थगित केल्याचे जाहीर केले व माल उचलण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Suspended the dealer's shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.