बिगाऱ्याच्या खूनप्रकरणी संशयित पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:42+5:302021-09-13T04:14:42+5:30
जुना आडगाव नाका काट्या मारुती पोलीस चौकी समोरील राम रतन लॉज खाली बंद असलेल्या दुकानाजवळ गेल्या शुक्रवारी रात्री नऊ ...

बिगाऱ्याच्या खूनप्रकरणी संशयित पोलीस कोठडी
जुना आडगाव नाका काट्या मारुती पोलीस चौकी समोरील राम रतन लॉज खाली बंद असलेल्या दुकानाजवळ गेल्या शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुनील नामक बिगा-याचा पंडित गायकवाड याने गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या सुनीलने जीव वाचविण्याच्या प्रयत्नात जुना आडगाव नाका ते सेवाकुंज दरम्यान पळ काढला होता. मात्र सेवाकुंज जवळ मिलसमोर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळून सुनीलचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पळ काढलेल्या लंगड्याला पंचवटी पोलिसांनी तपोवन परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर रविवारी संशयित लंगड्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान. मयत सुनील याचा पूर्ण नाव पत्ता तसेच त्याचे वारसदार मिळून न आल्याने पोलिसांसमोर मयत व्यक्तीच्या वारसाचा शोध घेणे कसोटीचे ठरणार आहे.