ज्वार्डीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यूा्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:14 IST2017-07-18T00:14:16+5:302017-07-18T00:14:28+5:30
ग् रामस्थांचे ठिय्या : खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ज्वार्डीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यूा्
लोकमत न्यूज नेटवर्क
आझादनगर : तालुक्यातील ज्वार्डी येथील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या नातेवाइकांवर ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला असून, खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपीस अटक करावी या मागणीसाठी सामान्य रुग्णालयासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
तालुक्यातील ज्वार्डी येथील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या रोशन तात्यासाहेब दैतकर या तरुणाचा मृतदेह रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान निमगाव शिवारातील विहिरीत आढळून आला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, मृताच्या आप्तेष्टांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेहाची अवस्था पाहून मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पोलीस संशयितांना पाठीशी घालत मृतदेहाची अवहेलना करीत असल्याचा आरोप करीत ठिय्या रुग्णालयात काही काळ आंदोलन केले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवून कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आला. आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह विहिरी बाहेर काढू देणार नाही असा पवित्रा नातलगांनी घेतला त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
पोलिसांकडून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन वेळोवेळी देण्यात आले. मात्र याचा काही उपयोग झाला नाही.
काही काळानंतर ग्रामस्थांनी शहर पोलीस नियंत्रण कक्षातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय गाठून ठिय्या मांडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (ग्रा.) शशिकांत शिंदे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी नियंत्रण कक्ष गाठून रोशनच्या नातलगांची व गावकऱ्यांशी चर्चा करून न्यायवैधक तपासणीसाठी मृतदेह धुळे येथे पाठवण्याचीविनंती केली. आम्ही संशयितांचा कसून शोध घेत असून, न्यायवैधक तपासणी अहवालानुसार त्वरित कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर दुपारी १ वाजता रोशनचा मृतदेह न्यायवैधक तपासणीसाठी धुळे येथे पाठवण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे करीत आहेत.रात्री १० वाजता गावकऱ्यांची मने वळविण्यात पोलिसांना यश आले. रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. सोमवारी सकाळी डॉ. किशोर डांगे यांनी न्यायवैधक तपासणीसाठी धुळे येथे घेऊन जावा लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा शवगृहाबाहेरच ठिय्या मांडला.