सासूसह बालकाची हत्या करणारा संशयित गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:20 IST2017-08-23T23:46:53+5:302017-08-24T00:20:41+5:30
मखमलाबाद शिवारातील गांधारवाडी परिसरात राहणाºया सासूसह मेहुणीच्या आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या करून फरार असलेला रामवाडी (तळेनगर) येथील संशयित मोतीराम धोंडीराम बदादे याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी (दि.२३) महामार्गावरील ठक्कर बझार परिसरातून अटक केली आहे. बदादे हा सव्वा महिन्यापासून फरार होता.

सासूसह बालकाची हत्या करणारा संशयित गजाआड
पंचवटी : मखमलाबाद शिवारातील गांधारवाडी परिसरात राहणाºया सासूसह मेहुणीच्या आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या करून फरार असलेला रामवाडी (तळेनगर) येथील संशयित मोतीराम धोंडीराम बदादे याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी (दि.२३) महामार्गावरील ठक्कर बझार परिसरातून अटक केली आहे. बदादे हा सव्वा महिन्यापासून फरार होता. बदादे याने सासू मंदाबाई दशरथ खराटे (५५), मेहुणीचा मुलगा नैतिक लिलके (८) यांची रामवाडी परिसरातील चौघुले पेट्रोलपंपासमोर असलेल्या दाट झाडीत हत्या करून सासरे दशरथ सोनू खराटे यांच्यावरही खुनी हल्ला केल्याची घटना (दि.१३) जुलैला उघडकीस आली होती. गेल्या जुलै महिन्यात बदादे याने पाथर्डी फाटा परिसरात राहणाºया सासू मंदाबाई खराटे व मेहुणीचा मुलगा नैतिक लिलके यांना काहीतरी खोटे सांगून दुचाकीवर बसवून चौघुले पेट्रोलपंपासमोर असलेल्या मोकळ्या दाट झाडीत नेले व तेथे दोघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर संशयिताने सासरे दशरथ खराटे यांना गाठून सासू व नैतिक यांना भामट्यांनी रस्त्यात लुटले आणि लूटमार करणारे पैशांची मागणी करीत असल्याचे खोटे सांगून सासºयाला चौघुले पेट्रोलपंपासमोर मोकळ्या जागेत नेले. मात्र घटनास्थळी रक्ताचे डाग व पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून त्यांनी पळ काढला. त्यावेळी संशयिताने त्यांच्या डोके व हातावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. जावयाच्या तावडीतून सुटका करून खराटे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
बुधवारी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना खून प्रकरणातील फरार संशयित बदादे हा ठक्कर बझार परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, हवालदार मोतीराम चव्हाण, आप्पा गवळी, सचिन म्हसदे, सतीश वसावे, भूषण रायते, बस्ते आदींनी ठक्कर बझार परिसरात सापळा रचून बदादे याला बेड्या ठोकल्या.