महिलेच्या पर्समधील रोकड चोरणाऱ्या संशयितास अटक
By Admin | Updated: April 4, 2016 00:10 IST2016-04-04T00:00:50+5:302016-04-04T00:10:52+5:30
महिलेच्या पर्समधील रोकड चोरणाऱ्या संशयितास अटक

महिलेच्या पर्समधील रोकड चोरणाऱ्या संशयितास अटक
नाशिक : ठक्कर बाजार बसस्थानकातून बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या बॅगेतील रोकड चोरणारा संशयित रमेश विलास शिंदे (५५, सिन्नर) यास सरकारवाडा पोलिसांनी शनिवारी (दि़२) सायंकाळच्या सुमारास ताब्यात
घेतले़
याबाबत अधिक माहिती अशी की, धनश्री किरण व्यवहारे (रा़त्र्यंबकेश्वर) या त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ठक्कर बसस्थानकावर आल्या़ त्र्यंबकच्या बसमध्ये चढत असताना आपल्या बॅगेतील दोन लाख रुपये कोणीतरी काढून घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली़
सरकारवाडा पोलिसांनी या माहितीनंतर तत्काळ संशयित रमेश शिंदेचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले़ तसेच त्याच्याकडून चोरलेल्या दोन लाख रुपयांपैकी दीड लाखाची रोकडही हस्तगत केली आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित शिंदेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)