मकवाना खून प्रकरणातील संशयितास अटक
By Admin | Updated: May 6, 2016 00:26 IST2016-05-05T22:57:02+5:302016-05-06T00:26:47+5:30
मकवाना खून प्रकरणातील संशयितास अटक

मकवाना खून प्रकरणातील संशयितास अटक
नाशिकरोड : अडीच महिन्यांपूर्वी जयभवानीरोड येथील युवक रणजित मकवाना याच्या खून प्रकरणातील फरारी संशयित मयूर बेद याला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.
जयभवानीरोड येथील युवक रणजित जगशरण मकवाना याची पूर्ववैमनस्यातून १६ फेब्रुवारी रोजी रात्री आर्टिलरी सेंटररोड जैन भवन येथे संशयित रोहित ऊर्फ माले गोविंद डिंगम, संजय ऊर्फ मॉडेल चमन बेद, विनोद राजाराम साळवे, मयूर चमन बेद या चौघांनी डोक्यात गावठी बंदुकीतून गोळी मारून खून केला होता.
याप्रकरणी काही दिवसांतच पोलिसांनी रोहित डिंगम, संजय बेद व विनोद साळवे या तिघांना अटक केली होती. सध्या तिघेही संशयित नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून फरारी असलेला संशयित मयूर बेद याला उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे पकडले. संशयित मयूर याला दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)