काश्मीरमधील शांतता राखण्यात सरकार अपयशी सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप : सत्तेसाठी पीडीपीसोबत युती

By Admin | Updated: April 22, 2015 01:22 IST2015-04-22T01:21:41+5:302015-04-22T01:22:04+5:30

काश्मीरमधील शांतता राखण्यात सरकार अपयशी सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप : सत्तेसाठी पीडीपीसोबत युती

Sushilkumar Shinde accused of failing to maintain peace in Kashmir: Alliance with PDP for power | काश्मीरमधील शांतता राखण्यात सरकार अपयशी सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप : सत्तेसाठी पीडीपीसोबत युती

काश्मीरमधील शांतता राखण्यात सरकार अपयशी सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप : सत्तेसाठी पीडीपीसोबत युती

  नाशिक : काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी शांतता भंग केली असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यास भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केवळ सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपाने पीडीपीसोबत युती केली असून, काश्मीर प्रश्नावर सरकार अजिबात गंभीर नसल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आले असता सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकाराशी बोलताना हे वक्तव्य केले. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात काश्मीरमध्ये देशविरोधी कृत्य करणाऱ्या फुटीरतावाद्यांवर कठोर कारवाई केली होती. यातील बरेच फुटीरतावादी आजही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. या सर्वांना मुक्त करण्यासाठी भाजपा सरकारचा प्रयत्न आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपाने पीडीपीसोबत युती केली. मात्र, त्यानंतर काश्मीर मुद्याला हेतुपुरस्सर बगल देण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचाही आरोप त्यांनी याप्रसंगी केला.

Web Title: Sushilkumar Shinde accused of failing to maintain peace in Kashmir: Alliance with PDP for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.