पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सुशील सोनवणेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 03:20 PM2018-06-22T15:20:39+5:302018-06-22T15:20:39+5:30

लोहोणेर : - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत लोहोणेर येथील युवक सुशील राजेंद्र सोनवणे याने यश मिळवले आहे .

Sushil Sonawane's success in the Police Sub-Inspection Examination | पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सुशील सोनवणेचे यश

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सुशील सोनवणेचे यश

Next

लोहोणेर : - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत लोहोणेर येथील युवक सुशील राजेंद्र सोनवणे याने यश मिळवले आहे . थेट पोलीस उपनिरीक्षक होण्याचा प्रथम मान सोनवणे याने लोहोणेर गावातून मिळविला आहे. सुशील हा एका सुशिक्षित व गरीब घरातील विद्यार्थी असून त्याच्या घरातील तीन पिढ्या हया शिकलेल्या सवरलेल्या आहेत. सुशील याचे आजोबा कै. पोपट वनसाराम सोनवणे हे पशुवैद्यकीय अधिकारी होते तर त्याचे वडील कैलास सोनवणे हे सेवानिवृत्त भारतीय जवान आहेत. त्याचा मोठा बंधू अमोल हाही सध्या भारतीय सैन्यात सेवेत कार्यरत आहे. सुशीलच्या यशाबद्दल लोहोणेर ग्रामस्थांच्या वतीने येथील ग्रामपंचायतीचे सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक बच्छाव, रमेश आहिरे, धनराज महाजन , मधुकर बच्छाव, अनिल धामणे, बंडू परदेशी, योगेश पवार, अविनाश महाजन, राजेंद्र सोनवणे, जगन खडाले, बापू जाधव, राहुल खरोटे, बबलू सोनवणे, मिच्छद्र बागुल, निबा आहिरे, आदीसह मंडळ अधिकारी रामिसग परदेशी , तलाठी पूरकर, ग्रामविकास अधिकारी यु. बी.खैरनार आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ व तरु ण वर्ग उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे लोकसेवा आयोगाच्या या पोलीस उप निरीक्षक परीक्षेत देवळा तालुक्याने आपली हेट्रिक पूर्ण केली असून लोहोणेर येथील सुशील सोनवणे याचे बरोबर महाल पाटणे समाधान भाटेवाल व उमराने येथील सूरज देवरे या तीनही युवकांनी देवळा तालुक्याचे नाव उज्जवल केले असल्याने आमदार राहुल अहेर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Sushil Sonawane's success in the Police Sub-Inspection Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक