‘सूर्यमालेची सफर’ माहितीपटाची निर्मिती
By Admin | Updated: August 14, 2016 21:50 IST2016-08-14T21:49:32+5:302016-08-14T21:50:33+5:30
शासनाची परवानगी : केंद्रीय फिल्म बोर्डाचे मिळाले प्रमाणपत्र; शाळांमध्ये प्रदर्शन

‘सूर्यमालेची सफर’ माहितीपटाची निर्मिती
सटाणा : काही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडविताना त्यांना सर्व विषयांचे आकलन सोप्या पद्धतीने होते की नाही यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. असाच काहीसा प्रयत्न मधुकर कोटनाके या प्राथमिक शिक्षकाने केला आहे.
त्यांच्या संकल्पनेतून सटाणा येथील प्रवीण खैरनार यांनी दिग्दर्शित केलेल्या व दीपक महाजन यांच्या की प्रेम अनिमेशन अकॅडमीत ‘चला सूर्यमालेची सफर करूया’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
या शैक्षणिक माहितीपटाला केंद्रीय फिल्म बोर्डाने प्रमाणपत्र दिले असून, राज्यातील प्रत्येक शाळेत हा माहितीपट दाखविण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. (वार्ताहर)