लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहोचवा सूर्यकांत शिंदे : पिंंपळगाव बसवंत येथे आढावा बैठक; सहभाग वाढविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:57 IST2017-11-12T23:57:33+5:302017-11-12T23:57:38+5:30
येथे ९ डिसेंबर रोजी होणाºया लोकन्यायालयासंदर्भात जिल्हा प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आढावा बैठक व पत्रकार परिषद घेऊन लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहचविण्याचे आवाहन केले.

लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहोचवा सूर्यकांत शिंदे : पिंंपळगाव बसवंत येथे आढावा बैठक; सहभाग वाढविण्याचे आवाहन
पिंपळगाव बसवंत : येथे ९ डिसेंबर रोजी होणाºया लोकन्यायालयासंदर्भात जिल्हा प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आढावा बैठक व पत्रकार परिषद घेऊन लोकन्यायालयाची संकल्पना घरोघरी पोहचविण्याचे आवाहन केले.
पिंपळगाव न्यायालयात ९ डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून, याआधी झालेल्या लोकन्यायालयात हजारो प्रकरणे निकाली काढली गेली आहेत. लोकन्यायालय संकल्पनेत नाशिक जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आला असून, पिंपळगाव बसवंत जिल्हात प्रथम आले आहे. याकामी पिंपळगाव बसवंत प्रथम न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव, विजय गवई आदींसह वकील संघाने केलेले काम व नियोजनाचे शिंदे यांनी विशेष कौतुक केले. लोकन्यायालय म्हणजे सामोपचाराने प्रकरण मिटवणे. आजपर्यंत न्यायालयात अनेक दावे पिढ्यान्पिढ्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी दावे निकाली काढावे यासाठी लोकन्यायालयाची संकल्पना मांडली गेली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.