निवृत्तिनाथ पालखीला सिडकोतील सर्जा-राजाची जोडी

By Admin | Updated: June 12, 2016 23:41 IST2016-06-12T22:46:23+5:302016-06-12T23:41:05+5:30

निवृत्तिनाथ पालखीला सिडकोतील सर्जा-राजाची जोडी

Suryaj-Raja pair of CIDCO in Nivittinath Pathikhi | निवृत्तिनाथ पालखीला सिडकोतील सर्जा-राजाची जोडी

निवृत्तिनाथ पालखीला सिडकोतील सर्जा-राजाची जोडी

 सिडको : संत निवृत्तिनाथ पालखी मिरवणुकीसाठी जायभावे कुटुंबीयांकडील राजा-सर्जा या बैलजोडीला यंदाच्या वर्षी मान देण्यात आल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही येत्या २० जून रोजी संत निवृत्तिनाथांची पालखी मिरवणूक त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे वैशिष्ट म्हणजे चांदीचा रथ असून, या रथाला सारथी म्हणून जायभावे बंधूंच्या सर्जा-राजा या बैलजोडीला मान देण्यात आला आहे.
लक्ष्मीबाई जायभावे यांची गेल्या अनेक वर्षांपासून पालखीला सर्जा-राजाची जोडी द्यावी, अशी इच्छा होती. सदर इच्छा पूर्ण झाल्याचे नगरसेवक तानाजी जायभावे यांनी सांगितले. यावेळी संतू पाटील जायभावे, बाळासाहेब जायभावे, पुंडलीक जायभावे, समाधान जायभावे, गोरख जायभावे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Suryaj-Raja pair of CIDCO in Nivittinath Pathikhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.