शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एजन्सीकडून  मिळकतींचे सर्वेक्षणच बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:27 IST

शहरातील हजारो मिळकतधारकांना लाखो रुपयांच्या दंडासह थकीत घरपट्टी भरण्याच्या नोटिसांमुळे अस्वस्थता निर्माण झाली असतानाच संबंधित एजन्सीकडून अत्यंत सदोष सर्वेक्षण झाल्याचे सिद्ध झाले.

नाशिक : शहरातील हजारो मिळकतधारकांना लाखो रुपयांच्या दंडासह थकीत घरपट्टी भरण्याच्या नोटिसांमुळे अस्वस्थता निर्माण झाली असतानाच संबंधित एजन्सीकडून अत्यंत सदोष सर्वेक्षण झाल्याचे सिद्ध झाले. ५९ हजार मिळकतींपैकी २२ हजार मिळकती संबंधित एजन्सीने बेकायदेशीर ठरवल्या होत्या. मात्र महापालिकेने नगररचनाकडील दस्तावेजांच्या आधारे केलेल्या तपासणीत २२ हजार मिळकती अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द प्रशासनानेच यासंदर्भात कबुली दिल्यानंतर आता शहरवासीयांना अधिक नोटिसा न देण्याचा तसेच दिलेल्या नोटिसा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी (दि.१९) झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्याचबरोबर संबंधित एजन्सीच्या अहवालाचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेशही महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत.महापालिकेची मासिक महासभा बुधवारी (दि.१९) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गेल्या महिन्याच्या महासभेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २ लाख ६९ हजार मिळकती बेकायदेशीर असल्याच्या वृत्तावरून सात तास चर्चा झाली होती. त्यावेळी मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या नव्हत्या. परंतु आता मात्र नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यात अनेक प्रकारचे घोळ असून उत्तरे देताना नागरिकांचे नाकीनव आले आहे. लाखो रुपयांच्या नोटिसांमुळे गोंधळ सुरू असताना गुरुवारी झालेल्या महासभेत यावर वादळी चर्चा झाली आणि याचवेळी सदोष सर्वेक्षणाची कबुली दिली.महापालिकेच्या वतीने शहरात ५९ हजार मिळकतींना घरपट्टी लागू नसल्याचे एका खासगी एजन्सीच्या सर्वेक्षणात आढळले. त्यानंतर महापालिकेने ५० हजार नोटिसांचे वाटप करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तथापि, यात अनेक प्रकारचे गोंधळ असून, ते आयुक्त राधाकृष्ण गमे आणि उपआयुक्त महेश डोईफोडे यांनी कबूल केले. एजन्सीच्या सर्वेक्षणानुसार एकूण ५९ हजार मिळकतींपैकी सुमारे २२ हजार मिळकतींच्या महापालिकेकडे असलेल्या दस्तावेजानुसार तपासणी केल्यानंतर त्या अधिकृत असतानादेखील बेकायदेशीर ठरविल्याचे आढळले.व्यावसायिकाला आली एक लाखाची घरपट्टीगुरुमित बग्गा यांनी महापालिकेच्या जाचक नोटिसा सांगताना पंचवटीत एका चर्मकाराला एका लाख रुपयांची नोटीस आली असून, ही रक्कम हातावरचे पोट असलेला हा चर्मकार कसा भरेल, असा प्रश्न केला. सामासिक अंतर आणि स्टील्ट पार्किंगच्या जागा नगररचनाच्या नियमानुसार सोडल्या जात असताना त्यावर लाखो रुपयांची घरपट्टी आकारण्याच्या नोटिसा बजावल्या जात असल्याचे सांगितले तर अ‍ॅड. वैशाली भोसले यांनी लव्हाटेनगर येथे असलेल्या बंगल्याबाबत अशोकस्तंभ येथील पत्त्यावर नोटिसा पाठविण्यात आल्याचा अजब प्रकार उघड केला.पाणीपट्टीत परस्पर वाढ, नागरिकांना मोठा भुर्दंडगेल्या वर्षभरापासून वाढीव घरपट्टीचे मोठे संकट नाशिककरांवर आले असतानाच आता पाणीपट्टीत माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परस्पर वाढ केल्याचेदेखील पुढे आले आहे. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी यासंदर्भात महासभेत माहिती देतानाच कर वसुली विभागाचे उपआयुक्त महेश डोईफोडे यांनी त्यास दुजोरा दिला. पाण्याच्या वापरानुसार दराचा स्लॅब बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्लॅबमुळे पाणीपट्टीत वाढ झाल्याचेही डोईफोडे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकरNashikनाशिक