वाहतुकीसंबंधी मनपातर्फे सर्वेक्षण

By Admin | Updated: July 23, 2016 01:05 IST2016-07-23T01:00:45+5:302016-07-23T01:05:30+5:30

सल्लागाराची नियुक्ती : घरोघरी घेणार माहिती

Survey by Transportation Mantra | वाहतुकीसंबंधी मनपातर्फे सर्वेक्षण

वाहतुकीसंबंधी मनपातर्फे सर्वेक्षण

 नाशिक : महापालिकेने शहरातील वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सर्वेक्षण करण्याकरिता दिल्ली येथील संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर संस्था घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहे.
शहरातील वाहतुकीचा अभ्यास करणे आणि वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करण्यासाठी दिल्ली येथील मे. अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लिमिटेड या संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर तज्ज्ञ सल्लागार कंपनी अहवाल तयार करण्यासाठी शहरात विविध प्रकारचे सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणात घरोघरी जाऊन रहिवासी-कौटुंबिक प्रवासाची माहिती, शहर बस वाहतूक आणि प्रवासी बससेवा, ट्रॅफिक सिग्नल, वाहनतळ त्याचबरोबर नागरिकांना रोजच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी आदि विषयी माहिती संकलित केली जाणार आहे. सदर कंपनी ही चौकाचौकात जाऊन पार्किंगचीही माहिती घेणार असून, त्यानुसार काही भागांत प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Survey by Transportation Mantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.